पिंपरी – विविध प्रकारच्या सेवा एकाच वेळी प्रदान करण्याची क्षमता असणारी प्रणाली पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यांसाठी राबविण्यात येणार आहे. पहिल्यांदा कर संकलन विभागासाठी ही तांत्रिक प्रणाली उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामध्ये 25 इंग्रजी आणि 25 मराठी प्रश्न-उत्तरे तयार करून संगणक प्रणालीद्वारे नागरिकांना माहिती उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. स्थायी समितीने या प्रस्तावास मान्यता दिली.
No comments:
Post a Comment