पिंपरी - औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)सारख्या रोजगाराभिमुख क्षेत्राकडे मुलींचा कल वाढावा, यासाठी त्यांना ३० टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आरक्षणाच्या तुलनेत १० टक्केदेखील मुली प्रवेश घेत नसल्याचे एका माहितीतून स्पष्ट झाले आहे. या वर्षी तीन हजार ३३९ जागांपैकी केवळ ५९३ जागांवर प्रवेश घेतला असून, त्यातून मुलींची आयटीआयविषयी उदासीनता दिसून येते.
No comments:
Post a Comment