पुणे – पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाने नुकताच भूजल अधिनियम जाहीर केला आहे. त्यानुसार निवासी, अनिवासी इमारतींवरील पावसाच्या पाण्याची साठवण आणि पाणी पुनर्भरण करणे बंधनकारक केले आहे. पाणी पुनर्भरणासाठी (रेन वॉटर हार्वेस्टिंग) शहरातील सर्व मेट्रो प्रकल्पांनी सहभाग दर्शविला आहे. शहरात होऊ घातलेल्या मेट्रो मार्गावरील सर्व स्टेशन्सवर आणि मेट्रो मार्गावरील दोन पिलरच्या मधल्या जागेत पाणी पुनर्भरण यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment