Wednesday, 22 August 2018

आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज

दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने पवना धरण १०० टक्के भरले असून धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकाठावरील वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे, रस्ते, पूल पाण्याखाली जाऊ शकतात. अशा आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष तसेच क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पूरनियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले असून नागरिकांनी या केंद्राशी संपर्क साधावा असे, आवाहनही त्यांनी केले.

No comments:

Post a Comment