सांगवी – पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असलेली कामे विद्यमान नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे अद्यापही सुरूच आहेत. विशेष म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केलेली रस्ते खोदाई अद्याप जैसे थे आहे. ही कामे पूर्ण करायची सोडून पिंपळे गुरवमधील महत्त्वाच्या सर्वच रस्त्यांवर अजूनही खोदाई सुरूच आहे. जे खड्डे बुजवले होते, ते पुन्हा खोदण्यात आले आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये पिंपळे-गुरव परिसरातील रस्ते सात ते आठ वेळा खोदण्यात, बुजवण्यात आणि पुन्हा खोदण्यात आले आहेत.

No comments:
Post a Comment