पिंपरी – पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव, रांजणगाव या औद्योजिक परिसरातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याबाबत पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखालील संघटनेच्या शिष्टमंडळाने उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी, उद्योगाशी संबंधित सर्व खात्याचे मंत्री व अधिकारी यांची लवकरच मुंबई येथे बैठक घेऊन उद्योग क्षेत्राच्या सर्व समस्या व मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन देसाई यांनी दिले.

No comments:
Post a Comment