Friday, 31 August 2018

वाहतूक कोंडीचा ‘आयटी’ला आर्थिक फटका

हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे वार्षिक १५०० कोटींचे नुकसान; पायाभूत सुविधांचाही अभाव

राज्यातील सर्वात मोठे ‘आयटी पार्क’ अशी ओळख असलेल्या हिंजवडी ‘आयटी पार्क’कडे जाणाऱ्या रस्त्यावर होत असलेली प्रचंड वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे तेथील लहान-मोठय़ा कंपन्यांचे मिळून वार्षिक तब्बल पंधराशे कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. विशेष म्हणजे वाहतूक कोंडीमुळे हिंजवडी ‘आयटी पार्क’मध्ये पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्यांना वार्षिक बारा लाख किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे.

No comments:

Post a Comment