पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात मनुष्यबळ कमी आहे. त्यावर उपाय म्हणून आम्ही अदृश्य पोलिसिंग करण्यावर भर देणार असल्याचे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी सांगितले. पोलिस समोर नसले, तरी कारवाई होईल; त्यासाठी नागरिकांनी समाजात सुरू असलेल्या गैरप्रकाराचे फोटो ‘व्हॉटसअॅप’ करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पत्रकारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर, यांच्यासह माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment