काम देण्यासाठी उद्योजकांना दिल्या जातात धमक्या
चाकण : कारखाना उभारणीसाठी लागणार्या मुरूम भरावासह अन्य कामे देण्यासाठी स्थानिक तरूणांमध्ये स्धर्पा सुरू आहेत. यासाठी स्थानिक युवक उद्योजकांना त्रास देत आहेत. या स्पर्धेमुळे अनेकदा भांडणाचे प्रसंग उद्भवतात. याचा फटका कारखानदारांना बसतो आहे. फुकटचा मुरूम उचलणे आणि त्यातून लाखोंची माया जमा करणार्या दोन गटांमध्ये वारंवार वाद होत आहेत. या सर्वांना संभाळणे उद्योजकांसाठी मोठी डोकेदुखीचा विषय होत आहे. आतापर्यंत चाकण परिसरामध्ये एमआयडीसीचे 4 टप्पे पूर्ण झाले आहेत. आता पाचवा टप्पा होणार आहे. नागरिकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने नव्याने कारखाने उभे रहात आहेत. मात्र सध्या येथील उद्योजकांना धमकी देण्याचे प्रकार उघड होत आहेत.
No comments:
Post a Comment