स्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल टाकलेल्या पुण्यात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. परिणामी शहराला वाहतूक कोंडीचा रोज सामना करावा लागतोय, असे ३५ टक्क्यांहून अधिक पुणेकरांचे म्हणणे आहे. ही समस्या सोडविण्यासाठी गेल्या पाच वर्षांत ११ प्रकल्पांची घोषणा झाली; परंतु यापैकी मेट्रोच्या दोन मार्गांचे प्रत्यक्ष काम सुरू आहे. बाकीचे प्रकल्प कागदोपत्रीच. त्यांच्या पूर्ततेचा कालावधीही अजून तीन ते पाच वर्षे आहे. हे प्रकल्प पूर्ण होतील अन् वाहतुकीच्या जीवघेण्या कोंडीतून सुटका होईल, अशी अपेक्षा पुणेकर बाळगून आहेत; पण लोकप्रतिनिधी व प्रशासनाला मात्र त्याबद्दल खेद ना खंत...
No comments:
Post a Comment