पिंपरी : एशिया पॅसिफिक मास्टर गेम्स सप्टेंबरमध्ये मलेशिया येथे होणार आहेत. यासाठी पिंपरी-चिंचवडमधील आंतरराष्ट्रीय प्रौढ खेळाडू पराग पाटील यांची तयारी सुरु आहे. आजवर त्यांनी देशासाठी 11 आंतरराष्ट्रीय पदके मिळविली आहेत. मात्र देशाने त्यांची कसलीही दखल घेतली नाही. आर्थिक परिस्थिती बिकट असून देखील पाटील यांनी केवळ देशाची मान उंचावण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. स्पर्धेत 57 देश सहभागी होणार आहेत. 30 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले खेळाडू सहभाग घेऊ शकतात. पाटील यांनी या स्पर्धेत 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, लांब उडी आणि तिहेरी उडी या चार मैदानी स्पर्धा प्रकारांमध्ये सहभाग घेतला आहे. भारतातून एकूण 30 खेळाडू या स्पर्धेसाठी जाणार आहेत.
No comments:
Post a Comment