उमेदवारी देताना दोन गट नाराज झाल्याने घेतली जात आहे खबरदारी
पिंपरी-चिंचवड : भाजपचे पिंपरी-चिंचवड महापालिकेत बहुमत आहे. 128 सदस्य असलेल्या पालिकेत या पक्षाचे 77 सदस्य आहेत. तरीही 4 ऑगस्टला होऊ घातलेल्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी भाजपने गुरूवारी व्हिप (पक्ष आदेश) जारी केला. त्यामुळे तो चर्चेचा विषय झाला आहे. महापौर पदासाठी उमेदवारी देताना भाजपमधील दोन गट नाराज झाल्याने ही खबरदारी घेण्यात आल्याचे समजते. मात्र काही स्थानिक गाववाले नगरसेवक यांना मानाची पदे मिळाली नाहीत व खर्या ओबीसीवर अन्याय झाल्यामुळे काही नगरसेवक भाजपच्या धेयधोरणावर नाराज आहेत. कदाचित हे बंडोबा खवळले तर भाजपला सत्ता असूनही महापौर निवडणूकीत सत्तेवरुन पायउतर होण्याची नामुष्की ओढवेल या भितीने पिंपरी-चिंचवड शहर भाजपकडून व्हीप जारी केला असल्याची चर्चा शहरात आहे.
No comments:
Post a Comment