पिंपरी-चिंचवड : पंतप्रधान आवास योजनेतील बोर्हाडेवाडी गृहप्रकल्पाचा पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिरणाच्या गृहप्रकल्पाशी तुलना करून सविस्तर अहवाल स्थायी समितीसमोर मांडला आहे. समिती जो निर्णय घेईल, त्यानुसार पालिका प्रशासन कारवाई करेल. या प्रकल्पाचा ‘डीपीआर’ राज्य व केंद्राच्या समितीने तपासणी करूनच मान्य केला आहे. त्यात नव्याने दुरूस्ती केल्यास पुन्हा राज्य व केंद्राची मान्यता घ्यावी लागणार, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment