Thursday, 13 September 2018

नगरसेवक, अधिकारी कर्मचार्‍यांकडून केरळसाठी 1 कोटी 6 लाखांची मदत

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्त
पिंपरी-चिंचवड : पुरामुळे उध्वस्त झालेल्या केरळवासीयांच्या मदतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सर्वपक्षीय नगरसेवक आणि कर्मचारी धावून गेले आहेत. सर्वपक्षीय नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन आणि अधिकारी व कर्मचार्‍यांचे एक दिवसाचे वेतन मदत म्हणून देण्यात आले. भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे व ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकूण 1 कोटी 6 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश बुधवारी (दि. 12) सुपूर्त करण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास बारणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment