Thursday, 13 September 2018

16 कोटीच्या विकास कामांना मंजुरी

विधवा व घटस्फोटीत महिलांना घरगुती व्यवसायासाठी अर्थसहाय्य
स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय
पिंपरी-चिंचवड : शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 16 कोटी 42 लाख 50 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागाकडील महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील विधवा व घटस्फोटीत महिलांना घरगुती व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणे ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अर्थ सहाय्यामध्ये वाढ करून ती दहा हजार प्रति लाभार्थी करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र होणारे अर्ज यांचा विचार करता या पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे आवश्यक असून त्याकामी सुमारे एक कोटी 50  लाख रूपये इतकी खर्चासाठी तरतूद वर्गीकरण करणेस स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

No comments:

Post a Comment