Thursday, 13 September 2018

शौचालय कामात गोलमाल?

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वतीने कासारवाडीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी ‘पैसे द्या व वापरा’ तत्वावर शौचालय बांधले जाणार आहेत. या सुलभ शौचालयाच्या एकाच प्रकारच्या दोन्ही वेगवेगळ्या कामात तब्बल 41 लाख 9 हजार 146 रुपयांचा फरक आहे. स्थायी समिती सदस्यांनी देखील याची माहिती न घेता दोन्ही विषयांना डोळे झाकून मंजुरी दिली. हा फरक नेमका कोणत्या कारणांमुळे आहे, हे समितीला सांगता देखील आले नाही. सुलभ इंटरनॅशनल संस्थेकडून विद्याविकास शाळा आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत या ठिकाणी ही शौचालये बांधण्यात येणार आहेत. या दोन्ही ठिकाणी पुरुषांसाठी 10 शौचालये, सहा स्वच्छतागृहे, तर महिलांसाठी सात शौचालये व केअर टेकरसाठी रुम बांधली जाणार आहे.

No comments:

Post a Comment