Tuesday, 18 September 2018

आयुक्तांच्या घरी पर्यावरणपूरक आकर्षक आरास

विविध कला साहित्यांचा केला वापर
पिंपरी : घरात गणपती म्हटलं की त्याच्यासाठी खास सजावट केली जाते. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या घरच्या गणेशासमोर आकर्षक आरास करण्यात आली आहे. विद्या आणि कलेची देवता असलेल्या गणपतीसमोर विविध कला साहित्यांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. त्यामध्ये हार्मोनियम, तबला, तंबोरा तसेच पुस्तकांचा वापर करण्यात आला आहे. त्यातून पर्यावरण संवर्धन आणि कलेचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मोरवाडीतील बंगल्यावर मोठ्या उत्साहात गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. आयुक्तांचा घरी अनेक वर्षांपासून गणपती बसविला जातो. त्यांच्या घरी पाच दिवसांचे बाप्पा येतात. दरवर्षी गणपती समोर वेगवेगळी आकर्षक अशी आरास केली जाते. यंदा गणपतीसमोर पर्यावरणपूरक कलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment