Friday, 7 September 2018

खाडे यांनी स्विकारली प्राधिकरणाची सूत्रे पण…

पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाला अखेर 18 वर्षांनी अध्यक्षपद लाभले असून सदाशिव खाडे यांनी आज (शुक्रवारी) अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्याला भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. मात्र, नव्यांनी पाठ फिरवल्याने भाजपमधील खदखद अजूनच अधोरेखीत झाली आहे.

No comments:

Post a Comment