पिंपरी (Pclive7.com):- मी ९६ कुळी शेतकरी असून असून गाय, म्हैस, बैल, कुत्रा, मांजर ही जनावरे पाळण्याची आमची परंपरागत संस्कृती आहे. हे सर्व प्राणी आमच्या कुटूंबियांचे सदस्य म्हणून पाहतो. त्यांना पोटच्या पोरापेक्षा जास्त सांभाळतो. यामध्ये कुठलाही जातीचा उद्देश ठेवून मी हे वक्तव्य केलेले नाही, उलट ९६ कुळी या शब्दाबाबत राजकारण करुन भाजपा राजकीय हिन राजकारण करत आहे. मी सिमा सावळे यांच्या अध्यक्षपदाच्या काळात मंजुर झालेल्या पंतप्रधान आवास योजनाच्या निविदेमध्ये झालेल्या भष्ट्राचाराच्या चौकशी मागणी केली आहे, तसेच कचरा संकलन निविदा, ४२५ कोटीचे रस्ते विकास योजना, वारक-यांसाठी ताडपत्री खरेदी, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आदी प्रकरणांमधिल गैरव्यवहार व भष्ट्राचारबाबत सत्ताधा-यांचे बुरखे फाडण्याचे काम मी केले आहे. ही भष्ट्राचाराची प्रकरणे पचविण्यासाठी सिमा सावळे यांचा थयथयाट चालू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment