पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी ही सर्व परिचित आहेच, त्यामुळेच शहरातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्याने शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाले. सराईत गुन्हेगारांचे खून, व्हाईट कॉलर गुन्हेगारांच्या हत्या, वाहनांची तोडफोड, महिलांची असुरक्षितता, कंपन्या, व्यवसायकडून हप्ता वसुली, जमिनीच्या ‘लिटीगेशन’मधून दहशत आणि भाई, अल्पवयीन गुन्हेगार यामुळे पिंपरी-चिंचवड शहर गुन्हेगारी नगरी झाले होते. या सोबतच शहरात बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्याची संख्या मोठी आहे. अनेक गुन्ह्यामध्ये अश्या हत्यारांचा वापर केला जातो. शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर हे अधोरेखीतच झाले आहे. एक महिन्यात सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल २१ पिस्तुल आणि ३६ काडतुसे मिळाली आहेत. तर चालू वर्षात आयुक्तालयातील १५ पोलीस ठाण्यात ४१ पिस्तुल आणि ७४ काडतुसे जप्त करण्यात आलेली आहेत.
No comments:
Post a Comment