हिंजवडीत होणारी दररोजची वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पालिकेचे सावित्रीबाई फुले उद्यान ते हिंजवडी ‘फेज थ्री’पर्यंत फ्री वे उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी वाकड उड्डाणपुलाच्या हद्दीपासून हिंजवडी ‘फेज थ्री’पर्यंतचा 5 कि.मी. अंतराचा रस्ता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पालिकेकडे हस्तांतरित करावा, तसेच, नियोजित उड्डाणपुलासाठी राज्य शासनाने अर्थसहाय करावे, अशी मागणी शिवसेना गटनेते नगरसेवक राहुल कलाटे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.

No comments:
Post a Comment