Saturday, 8 September 2018

दापोडीत नदीघाट स्वच्छतेचे काम सुरू

जुनी सांगवी - गणेशउत्सवासाठी विसर्जन घाट तयार ठेवण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने जुनी सांगवी, दापोडी परिसरातील नदी घाट व परिसराची स्वच्छता कामे सुरू असुन ती अंतीम टप्प्यात आली आहेत. दापोडी येथील गणपती विसर्जन पवना नदी घाटावर करण्यात येते. गणपती उत्सवा दरम्यान स्वच्छता व नदी प्रदुषण रोखण्यासाठी घाट स्वच्छतेबरोबरच निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात येणार आहेत. सांगवी दापोडी परिसरात घरगुती एक दिवसाचा गणपती, दिड दिवसाचा गणपती बसविण्यात येतो. तर सांगवीत सार्वजनिक मंडळे सात दिवसाचा उत्सव साजरा करून बाप्पांना सातव्या दिवशी निरोप देतात.तर काही ठिकाणी दहा दिवसाचा गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. दापोडीतील मोठी मंडळे हँरीस पुलाखाली गणपती विसर्जन करतात तर सांगवीतील पवना नदी घाटावर विसर्जन होते. आरोग्य विभागाच्या वतीने उत्सव काळातील उपाययोजना कामे सध्या सुरू आहेत.

No comments:

Post a Comment