चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवडच्या विकासामध्ये ज्या भूमिपुत्रांच्या जमिनी प्राधिकरणात आरक्षित झाल्या त्यांना साडेबारा टक्क्यांचा परतावा देण्यासाठी व इतर प्रलंबित प्रश्नांसाठी मी प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, स्थानिक खासदार, आमदार या सर्वांच्या सहमतीने माजी निवड झाली आहे. प्राधिकरणात गरीब कामगारांना घरे देण्याची योजना लवकरच तयार करुन त्याची अंमलबजावणी करु असे आश्वासन प्राधिकरणाचे नवनियुक्त अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी आज आपल्या पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिले
No comments:
Post a Comment