Thursday, 11 October 2018

चौकशी करून उपमहापौरांच्या फलकांवर कारवाई – आयुक्त

पिंपरी-चिंचवड : उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी वाढदिवसानिमित्त लावलेले फलक अधिकृत आहेत. काही फलक अनधिकृत असल्यास त्याची चौकशी केली जाईल. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या हल्लाबोल कार्यक्रमाचे पिंपळे गुरव येथील फ्लेक्स बेकायदेशीर ठरवत ते कार्यक्रमापुर्वीच तात्काळ काढून टाकण्याची तत्परता महापालिका प्रशासनाने काही दिवसांपुर्वी दाखविली होती. परंतु, सत्ताधार्‍यांचे फलक काढण्यास विलंब करत प्रशासन दुटप्पी करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

No comments:

Post a Comment