पुणे - ॲपच्या माध्यमातून विनापरवाना खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या ११३ कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून त्यांच्या विक्रीला चाप लावला आहे. या कंपन्यांना प्रशासनाने व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या सर्व कंपन्या स्विगी, झोमॅटो, फुडपांडा आणि उबर इट्स या कंपन्यांशी संलग्न आहेत. अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
No comments:
Post a Comment