निगडी – जमिअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र आकुर्डी शाखेच्या वतीने नशा विरोधी अभियानांतर्गत शहरात जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. “नशेचा नाश : देशाचा विकास’ या ध्येयाने आकुर्डी, रावेत, वाल्हेकरवाडी, चिंचवड, निगडी परिसरातील विविध शाळा, मस्जिद, झोपडपट्टीतील युवकांना नशेपासून परावृत्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी बॅनर्स, स्टिकर्स, पोस्टर, पत्रके आणि व्याख्यानांद्वारे प्रबोधन केले.

No comments:
Post a Comment