राज्यभरात चाळीस हजार कुटुंबे लॉंड्री व्यवसाय करत आहेत. त्यांना सध्या दिलेल्या वीजदराच्या सवलतीचा फायदा होणार आहे. पुढील तीन वर्षात विजेमध्ये क्रांती होणार असून, अपारंपरिक ऊर्जा देणे, कचर्यापासून वीजनिर्मिती असे वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. त्याचसोबत सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे लॉंड्री व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानाच्या छतावर सौर ऊर्जेचे पॅनल बसवून घ्यावेत त्यासाठी शासन २५ टक्के अनुदान देण्याची घोषणा करून त्याचा फायदा राज्यातील चाळीस हजार लॉंड्री व्यावसायिकांना होणार असल्याचे प्रतिपादन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
No comments:
Post a Comment