पिंपरी – पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी मनमानीपणे प्रवासी भाड्यांमध्ये दरवाढ केली आहे. वास्तविक, ट्रॅव्हल्स चालकांना तिकीट दरांच्या मर्यादा ठरवून दिल्या आहेत. तरीही, दसरा व दिवाळीच्या तोंडावर तिकीट दरांमध्ये दुप्पट ते पाचपट वाढ केली जात आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मनमानीला लगाम घालावा, अशी मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment