Sunday, 21 October 2018

पाणी प्रश्‍नावरून भाजपला “घरचा आहेर’

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याचा प्रश्‍न चांगलाच पेटला आहे. सत्ताधारी भाजप विरोधात विरोधक आक्रमक झाले असताना स्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेवर पाण्याच्या निषेधार्थ मोर्चा काढत “घरचा आहेर’ दिला आहे. पिंपळे निलख-वाकड प्रभागातील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी स्थानिक नागरिकांसह महापालिकेवर मोर्चा काढला होता. कामठे यांनी काढलेल्या या मोर्चाला भाजपचे नगरसेवक संदीप कस्पटे, आरती चोंधे, सुजाता पालांडे यांनी देखील पाठींबा दर्शवत प्रशासनाविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या.
गेल्या काही महिन्यांपासून पिंपळे निलख-वाकड प्रभागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही पाण्याची समस्या सुटलेली नाही. त्याचाच निषेध करण्यासाठी या प्रभागातील नागरिकांना नगरसेवक तुषार कामठे यांच्या नेतृत्वात महापालिकेवर मोर्चा काढला. आज (शनिवारी) महापालिकेची सर्वसाधारण सभा होती. या सभेपूर्वी कामठे यांनी महापालिकेवर प्रभागातील नागरिकांसह मोर्चा आणला होता. मात्र मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच हा मोर्चा अडविण्यात आला. यावेळी मोर्चात असलेल्या नागरिकांनी गेटसमोर ठिय्या मांडत महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

No comments:

Post a Comment