वाहतुकीचे नियम मोडले; सात दिवसात 207 जणांवर गुन्हे दाखल
दंड वसूल करण्यासाठी ‘पोलीस आपल्या दारी’ उपक्रम
पिंपरी : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या वाहन चालकांवर पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक विभागाकडून तात्काळ कारवाई करण्यात येत आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास ई-चलनद्वारे दंड आकारणे, दंड न भरल्यास गुन्हे दाखल करणे अशा प्रकारे ही कारवाई सुरु आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील एक आठवड्यात 207 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नो पार्किंग, राँग साईड, नो एंट्री, ट्रिपल सीट, सिग्नल जम्पिंग असे वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. वाहतूक विभागाकडून करण्यात येणार्या कारवाया आणि त्यांचे दंड वसूल करण्यासाठी ‘पोलीस आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एखाद्या वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर त्याबाबत वाहतूक विभाग पुरावे जमा करून थेट वाहन मालकाच्या घरी जाऊन दंडात्मक कारवाई करणार आहे. वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी (दि. 21) 43, शनिवारी 21, रविवारी 9,
No comments:
Post a Comment