पिंपरी - तुम्ही जर नोकरी, व्यवसायानिमित्त लोणावळ्यावरून दौंड परिसरात जात असाल, तर आगामी काळात तुमचा हा प्रवास सोईस्कर होणार आहे. लोणावळा ते दौंड मार्गावर लोकलसेवा सुरू करणे शक्य असून, त्यासंदर्भातील सकारात्मक अहवाल मध्य रेल्वेने सहा महिन्यांपूर्वी केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. येत्या काही दिवसांत बोर्डाने त्याला हिरवा कंदील दाखविल्यास प्रवाशांसाठी ते फायदेशीर ठरणार आहे.

No comments:
Post a Comment