विद्यार्थ्यांच्या दर्जा सुधारणे गरजेचे आहे. आजचे विद्यार्थी शहराचे उद्याचे भवितव्य आहे. त्यांना नाविन्यपुर्ण, स्मार्ट शिक्षण दिले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी मनापासून प्रयत्न करावेत, असे आवाहन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी शिक्षकांना केले. तसेच शहराताली सर्व शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत. याबाबत लवकरच शिक्षकांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली जाईल, अशी ग्वाही लांडगे यांनी शिक्षकांना दिली. तसेच हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यात येईल. महापालिका शाळेतील शिक्षकांसाठी धन्वंतरी योजना लागू करण्याच्या सूचना देखील त्यांनी पालिकेतील पदाधिका-यांना केली.
No comments:
Post a Comment