Wednesday, 7 November 2018

प्लास्टिक वापरणारांकडून 13 लाख रुपये दंड वसूल

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर धडक कारवाई करीत आहे. 1 एप्रिल ते 28 ऑक्‍टोबर 2018 पर्यंत प्लास्टिक वापरणाऱ्या 263 दुकानदारांकडून 13 लाख 55 हजार रुपये दंड वसूल केला व 10 हजार 511 किलो प्लास्टिक, थर्माकोल जप्त केले, अशी माहिती अतिरिक्‍त आयुक्‍त दिलीप गावडे यांनी दिली. 23 मार्चला राज्य शासनाने प्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी केली. त्यानंतर या वस्तूंचा साठा पूर्णपणे संपण्यासाठी 22 जूनपर्यंत मुदत दिली होती. प्लास्टिकच्या पिशव्या, चमचे, ग्लास, स्ट्रॉ, थर्माकोल ताट, ग्लास, वाट्या या वस्तूंना बंदी घातली आहे.

No comments:

Post a Comment