सल्लागार समितीची केली स्थापना
पिंपरी-चिंचवड : शहरातील जैवविविधतेचे महापालिकेमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानुसार जानेवारी 2019 पर्यंत शहरातील जैवविविधतेसाठी ’पॉलीसी’ आणि ’ऍक्शन प्लॅन’ तयार केला जाणार आहे. या कामासाठी मुंबईतील टेरेकॉन इकोटेक या सल्लागाराची नेमणूक करण्यात आली. जैवविविधता समितीच्या अध्यक्षा उषा मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नुकतीच बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, समितीच्या सदस्या कमल घोलप, अर्चना बारणे, सुवर्णा बुर्डे, अनुराधा गोरखे, महापालिकेचे उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, चंद्रकांत कोंडे, दिग्वीजय पवार बैठकीला उपस्थित होते.
No comments:
Post a Comment