साई चौकातील प्रशस्त उड्डाणपुलाची रावेतकडून (डांगे चौक) औंधकडे जाणारी एक बाजू डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात वाहनचालकांसाठी खुली होणार आहे. या पुलाची एकूण लांबी ७१० मीटर एवढी असून, रुंदी ८ मीटर आहे. २०१६ मध्ये सुरू झालेल्या या पुलासाठी २७ कोटी २० लाख रुपये इतका खर्च झाला असून, येथील हायटेन्शन केबलमुळे कामाला विलंब झाला आहे. डांगे चौकाकडून औंधकडे जाण्यासाठी कस्पटे वस्तीमार्गे विशालनगरवरून औंधकडे जावे लागत होते. पुलाची एक बाजू खुली झाल्याने वाहनचालकांना थेट औंधच्या दिशेने जाता येणार आहे; तसेच पिंपळेसौदागर-हिंजवडी हा दुतर्फा रस्ता साई चौकात 'फ्री-वे' होणार असल्याने शिवार चौकापासून साई चौकापर्यंतची कोंडी फुटेल, अशी माहिती स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिली.
No comments:
Post a Comment