पिंपरी : महापालिकेच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहराचे एक अनोखे स्थान तयार करण्यासाठी आणि नागरिकांची जीनवशैली उंचावण्यासाठी एक उच्च दर्जाचे शहर म्हणून ओळख निर्माण करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांचे सर्वेक्षण करून शहर परिवर्तन विकास आराखडा तयार केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, त्यामध्ये सर्वाधिक सर्वेक्षण चिंचवड परिसरातून केले गेले आहे. त्यामुळे हा आराखडा सर्वसमावेशक नसल्याचे स्पष्ट होत आहे. शहराची नवी स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी शहराची तुलना बुरसा, लिऑन, बार्सिलोना, फ्रँकफर्ट तसेच, बर्मिंगहॅम, रिओ, सँटीयागो, जोहान्सबर्ग, मँचेस्टर, स्टुटगार्ट, क्लालालंपूर, तेल अविव, कोन, इंदूर, मेक्सिको सिटी या निवडक जागतिक शहरांशी करण्यात येत आहे.शहर परिवर्तन कार्यालय (सिटी ट्रॉन्सफॉर्मेशन ऑफिस-सीटीओ) या खासगी एजन्सीच्या मार्फत पालिकेस शहराची सध्याची परिस्थिती व भविष्यातील स्थितीमधील फरक व अंतर ओळखण्यास व अंमलबजावणीस योग्य उपाय शोधण्यात येत आहेत. त्यासाठी पालिका सदर एजन्सीवर वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे.
No comments:
Post a Comment