पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाच्या समोरील जागेत नवीन उद्यान विकसित करण्यात येत आहे. लहान मुलांमध्ये विविध खेळांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हे उद्यान विकसित करण्यात येत असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या उद्यानामध्ये जॉगिंग ट्रॅक, अडथळ्यांची शर्यत, ट्री वॉकर्स, जंपर्स, वॉल क्लायबिंग आदी खेळणी बसविण्यात आली आहेत. त्याची ही चित्रमय झलक टिपली आहे "सकाळ'चे छायाचित्रकार अरुण गायकवाड यांनी.


No comments:
Post a Comment