पिंपरी : राज्य शासनाच्या आदेशानुसार हॉटेल्सच्या रुफ टॉपवर केल्या जाणर्या पार्ट्यांना प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. मोकळ्या आणि बंदिस्त जागेत 31 डिसेंबरच्या पार्टीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच मद्य विक्रीची परवानाधारक दुकाने पहाटे दीड वाजेपर्यंत तर हॉटेल्स पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तरुणाईने मोठ्या प्रमाणात नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी केली आहे. नववर्षाचे स्वागत करताना कायदा आणि सुव्यवस्था पाळण्यासाठी प्रशासन देखील विविध पातळ्यांवर सज्ज झाले आहे. हॉटेल, मद्य विक्रीची दुकाने यापासून ते मद्यपींवर होणार्या कारवायांबाबत देखील पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. सध्या 15 पोलीस ठाण्यांमध्ये 15 ब्रीद अॅनालायझर आहेत. त्यापैकी आठ नादुरुस्त आहेत. तसेच ऑनलाइन चलन करण्यासाठी 63 यंत्रे आहेत. आणखी 145 यंत्रांची मागणी पोलिसांनी सरकारकडे केली आहे. त्यामुळे वाहनचालक तळीरामांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
No comments:
Post a Comment