चिंचवड : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस.बी.पाटील कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड कॉमर्समध्ये घेण्यात आलेल्या विज्ञान, वाद-विवाद आणि प्रश्नोत्तर स्पर्धेत देहूरोड येथील शिवाजी विद्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला. तर एस.बी.पाटील कनिष्ठ विद्यालयास द्वितीय आणि एच.ए.स्कूलला तृतीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेस शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी) चे विज्ञान अधिकारी वैभव घोलप यांच्या हस्ते विजेत्या संघांचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.
No comments:
Post a Comment