Wednesday 19 December 2018

भोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने

चौफेर न्यूज – भोसरीत सध्या दादाची ‘दादागिरी’ सुरू आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर त्यांच्या दावणीला बांधले गेलेत. सत्ताधाऱ्यांचे ते घरगडी झालेत. यापूर्वीचा खाजगी तत्त्वावर रूग्णालय देण्याचा अनुभव क्लेशदायक असताना, भोसरीचे प्रस्तावित रुग्णालय खाजगी तत्वावर चालविणेस देण्याचा अट्टाहास केला जात आहे. स्थानिक आमदारांना या माध्यमातून त्यांचे नविन दुकान चालू करण्याचा ‘डाव’ आहे. हे रूग्णालय महापालिकेमार्फतच चालवले जावे. खाजगी तत्वावर रूग्णालय चालविण्यास देण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. याप्रकरणी साने यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देखील दिले आहे.

No comments:

Post a Comment