पिंपरी – शहरासह हिंजवडी, चाकण व तळेगाव दाभाडे एमआयडीसीत रोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचे पुनर्चक्रिकरण व पुनर्वापर प्रकल्प उभारण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार कासारवाडी व चिखलीत प्रकल्प प्रस्तावित असून सहा ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून रोज 312 दशलक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आहे.
No comments:
Post a Comment