पिंपरी चिंचवड ः वेदनेचा डोंगर घेऊन जाणार्या दिव्यांग आणि दृष्टिहीन विद्यार्थ्यांना संवेदनेचा हातभार लावण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड आणि दीपस्तंभ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टिहीन व दिव्यांग विद्यार्थ्यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक प्रकल्पांच्या निधी उभारणीसाठी या ऑर्केस्ट्राचे घेण्यात येत असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात येत आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शुक्रवारी (दि. 28) रोजी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
No comments:
Post a Comment