निसर्ग नियमानुसार आंब्याचा मोहर वसंत ऋतूत येतो व होळीच्या सणानंतरच आंब्याच्या कैऱ्या पहावयास मिळतात. बदलत्या हवामानामुळे पिंपरी चिंचवडच्या नैसर्गिक वृक्ष वाढीच्या चक्रामध्ये बदल पहावयास मिळत आहे. या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागाचा एक अभ्यास गट त्यामध्ये विजय मुनोत, अर्चना घाळी, संतोष चव्हाण, विजय जगताप, सतीश देशमुख, जयेंद्र मकवाना, विशाल शेवाळे, अमोल कानु, अजय घाडी, नितीन मांडवे तसेच समिती अध्यक्ष विजय पाटील हे “आपल्या शहरातील हिवाळी वृक्ष संपदा” ह्या विषयासंदर्भात निरीक्षण करीत आहेत. हे परीक्षण करीत असताना सदरचे आंब्याचे झाड निदर्शनास आले.
No comments:
Post a Comment