पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पवना नदीवरील रावेत बंधार्याची उंची अर्ध्या मीटरने वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे शहराला दोन दिवस पुरेल इतके पाणी उपलब्ध होणार आहे. या कामासाठी बंधारा व मागील बाजूस 8 किलोमीटर अंतरापर्यंत नदी पात्राचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यासंदर्भात अहवाल पाटबंधारे विभागाकडे लवकरच दिला जाणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतर पाटबंधारे विभागाच्या नियंत्रणाखाली पालिका बांधकाम करणार आहे.
No comments:
Post a Comment