Friday, 28 December 2018

बीआरटी’वर बस पुरविण्यास पीएमपी असमर्थ

पिंपरी- पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण पाच बीआरटीएस मार्गांवर सुरु असलेली बससेवा पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाकडे पुरेशा बस उपलब्ध नाहीत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील दोन बीआरटीएस मार्गांवर ही बससेवा सुरु करण्यास असमर्थ असल्याची धक्कादायक कबुली पीएमपीएमएल प्रशासनाने दिली आहे. अन्य मार्गांवरदेखील ही सेवा पूर्ण क्षमेतेने चालविण्यासाठी एकूण 565 अधिक बसची आवशक्‍यता असल्याची बाब पिंपरी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता व आळंदी बोपखेल या दोन प्रस्तावित मार्गांवर ही बस सेवा सुरु केली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

No comments:

Post a Comment