पिंपरी – महापौर राहुल जाधव यांनी सोमवारी (दि. 24) शहरातील बीआरटीएस मार्गांची पाहणी केली. सकाळी अकरा वाजता ऑटो क्लस्टर येथून या दौऱ्याला सुरुवात झाली.
या दौऱ्यादरम्यान काळेवाडी फाटा ते देहु आळंदी रस्ता या बीआरटीएस मार्गावरील बस सेवा सुरु करण्यासाठी बसेसच्या उपलब्धतेबाबत चौकशी केली व पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या कॉरिडॉर वरील काळेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा विकास आराखड्या प्रमाणे करण्याची देखील सूचना दिली. त्यानंतर बीआरटीएस कॉरिडॉर वर अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करणेबाबत शहर वाहतूक पोलीस यांना सूचना दिल्या. तसेच उर्वरीत बीआरटीएस मार्गाची पाहणी करणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.

No comments:
Post a Comment