पिंपरी - युरोपियन इन्व्हेस्टमेंट बॅंक आणि एएफडी फ्रान्स या दोन बॅंकांकडून पुणे मेट्रोसाठी सहा हजार कोटी रुपये कर्ज मिळणार असून, त्याची प्रक्रिया येत्या मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होईल. महामेट्रोच्या या प्रकल्पासाठी ११ हजार ४२० कोटी रुपये खर्च येणार असून, त्यापैकी साठ टक्के रक्कम कर्जाद्वारे उपलब्ध करायचे ठरले होते. दोन विदेशी बॅंकांमार्फत ती रक्कम मिळणार असल्यामुळे, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली रक्कम उभी राहणार आहे.
No comments:
Post a Comment