Wednesday, 26 December 2018

महापालिकेची अवैध नळजोड धारकांवरील कारवाई अधिक तीव्र

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने अवैध नळजोड धारकांवरील कारवाई अधिक तीव्र केली आहे. पाणीपुरवठा विभागाने आजपर्यंत 389 अवैध नळजोड तोडले असून त्यांचा पाणीपुरवठा बंद केला आहे. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील सर्वाधिक म्हणजेच 78 अवैध नळजोड तोडले आहेत. तर, सर्वात कमी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील 30 अवैध नळजोड तोडण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत होत आहे. शहरात अनधिकृत नळजोडचे प्रमाण जास्त आहे. चुकीच्या पद्धतीने नळ जोड केले आहेत. त्यामुळे 30 ते 40 टक्के पाण्याची गळती होत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. तसेच दुषित पाणीपुरवठा देखील होतो. त्यासाठी महापालिकेने मे महिन्यापासून अनिधकृत नळजोडचे सर्वेक्षण केले.

No comments:

Post a Comment