Wednesday, 26 December 2018

रावेत बंधार्‍याची पाणी पातळी तपासण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण

पिंपरी चिंचवड ः रावेत येथील जुन्या बंधार्‍याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्यात येणार आहे. पाणलोट क्षेत्राचे सर्वेक्षण महापालिकेतर्फे केले जाणार आहे. या सर्वेक्षणात बंधार्‍याची उंची वाढविणे, खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने बंधार्‍याच्या वरील बाजूस पाणलोट क्षेत्राच्या धोक्याची पाण्याची पातळी तपासण्यात येणार असून, त्यासाठी थेट पद्धतीने काम दिले जाणार आहे. याकरिता ड्रोन सर्वेक्षण करुन त्या कामास साडेपाच लाख रुपये खर्च होणार आहे.

No comments:

Post a Comment