नवी दिल्ली – आधार कार्ड सक्तीवरून केंद्र सरकाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला बँक खाते किंवा मोबाईल सिम घेण्यासाठी आधार कार्ड देणे बंधनकारक राहणार नाही. ते पूर्णतः ऐच्छिक असणार आहे. बँक किंवा टेलिकॉम कंपन्यांना ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड देण्यावर दबाव टाकला तर एक कोटीपर्यंत दंड भरावा लागणार आहे. एवढेच नव्हे तर कंपनीतील संबंधित कर्मचाऱ्यांना ३ ते १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
No comments:
Post a Comment